संस्कार वर्गातील मुलांची सुट्टीच्या काळात शिविरे घेणे.
यापुढेही आश्रमातील अत्यंत गरजू अशा चार व्यक्तींचा खर्च करणे.
पुढील वर्षात उत्पादीत वस्तूंची वाढ करुन ३० महिलांना नियमित रोजगार देणे.
विवडलेल्या समाज जीवनाचे निकोप समाज जीवन्त परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे.
छोट्या मुलांचे तयार कपडे, रजई यांचे उत्पादन वाढवून ४५ महिलांना नियमित काम देणे.
आज १० महिलांना रोजगार मिळत आहे. तो आणखी ५ जणांना मिळेल असा प्रयत्न करणे.
आदिवासी क्षेत्रातील ५ वाड्यांवरील व पेण शहराच्या परिसरातील महिलांना एकत्र करून सक्षम करणे.
संस्कृतचा प्रचार प्रसार करण्याचे काम असेच सुरु ठेवणे. ३० संस्कृत प्रशिक्षकतयार करणे.
प्रत्येक गरजू व्यक्तीला रक्त देता येईल असा प्रयत्न करणे. यासाठी रक्तदानाचे महत्व लोकांपर्यंत पोहचवणे. रक्तदान शिविरेही वास्त प्रमाणात घेणे.
वसतीगृहातील मुलींना नैमितीक शिक्षणावरोवर शिवणकला, संगणक शिक्षण, वालवाडी प्रशिक्षण तसेच खाद्यपदार्थ बनविणे व नर्सिंग इत्यादींचे प्रशिक्षण देणे.
अनुदान प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे वर्ग वाढइ.५वी ते ८ वी पर्यंत करणे. शासनाकडून वेळोवेळीमिळालेल्या सुचनांनुसार शालेय कामकाजात सुधारणा करणे.
पेण शहराजवळ ११ गुंठे जागेत महिला सक्षमीकरणासाठी उद्योग केंद्र व प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणे. त्याचबरोबर हिंडत्या फिरत्या वृद्धांसाठी संजीवन आश्रमाची व्याप्ती करणे.
महिला, मुलांसाठी व मोठ्यांसाठी महिन्यातून एकदा वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा घडवून आणणे. जेणे करुन चांगले साहित्य वाचण्याकडे कल वाढेल. मुलांसाठी वाचन वर्ग सुरु करणे.
१० वाड्यांवरील व्यक्तींची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी करणे. दरवर्षी १००० महिलांचे हिमोग्लोबीन तपासणी करून ते वाढविण्याचा प्रयत्न करणे. मेरा शहराच्या परिसरातील वस्त्यांवरही असाच प्रयत्न चालू करणे.